वेध वूमन एम्पॉवरमेंट फेडरेशन (NGO)

संस्थेविषयी :
वेगाने बदलणाऱ्या आजच्या आधुनिक युगात महिला सबलीकरण वा महिला सशक्तीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. महिला सबलीकरण म्हणजे ती स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते आणि कोणाच्याही सहाय्याशिवाय जीवन जगू शकते. महिला सबलीकरण ही काळाची गरज आहे. परिस्थितीनुसार सर्व क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. या सबलीकरणासाठी विविध कार्यक्रम व ध्येयधोरणे राबविले जात आहेत. त्यातून महिला विकासाचा तसेच महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, वैचारिक, कौटुंबिक, व्यावसायिक अशा विविध घटकांचा विचार केला जात आहे. महिला शक्ती देशाच्या विकासासाठी महत्वाची असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशाच्या विकासात महत्वाची भूमिका असलेल्या महिलांसाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केले जात आहे. महिलाच्या आर्थिक विकासासाठी विविध सामाजिक संस्था कार्य करत असून त्याव्दारे शेती व शेती पूरक व्यवसायाला चालना दिली जात आहे. वेध फेडरेशनच्या माध्यमातून महिला आर्थिक , सामाजिक, वैचारिक सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने काम करीत आहे. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना उद्योजकतेची जोड देणे महत्वाचे आहे. महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधील उद्योजकाला बळकटी देण्याचे महत्वाचे काम वेध करत आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये एक महिला उद्योजक तयार झालेस त्या गावाचा विकास होण्यास मदत होत आहे. उद्योगामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. वेध फेडरेशनच्या माध्यामतून महिला सक्षमीकरण , आरोग्य सुविधा, स्त्री-पुरुष समानता, सर्वधर्मसमभाव, व्यावसायिक प्रशिक्षण, शासकीय योजनाची माहितीचा पचार व प्रसार करणे, ग्रामीण भागामध्ये व्यवसाय उभारणी करणेसाठी सहकार्य करणे, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती वाढविणे, जेष्ठ नागरिक संघ स्थापन करणे, महिला बचतगट निर्मिती करणे, गावोगावी वाचनालय सुविधा तयार करणे अशा विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे.

संस्थेचे ध्येय व उद्दिष्टे :

  1. महिला-पुरुष बचतगट, युवक युवती बचतगट, शेतकरी बचतगट यांचे संघटन करणे.
  2. महिला-पुरुष बचतगट, युवक युवती बचतगट, शेतकरी बचतगट यांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणे.
  3. सामाजीतील सर्व घटकांना सोबत घेऊन आर्थिक सक्षम बनवणे.
  4. समाजामध्ये स्त्री पुरुष समानता निर्माण करणेसाठी विविध उपक्रम राबवणे.
  5.  समाजातील विविध घटकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे. तसेच व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करणे. यासाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणे.
  6.  ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देणे. व स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती वाढवणे.
  7.  समाजामध्ये आर्थिक स्थेर्य निर्माण करणेसाठी ग्रामीण भागामध्ये प्रक्रिया उद्योग, शेती पूरक उद्योग, कुट्टीर उद्योग, पॅकेजिंग उद्योग यांची निर्मिती करणे.
  8. समाजामध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबवणे. यामध्ये विविध प्रकारचे आरोग्य शिबीर, विविध प्रकारचे रक्तदान शिबीर, महिलासाठी आरोग्य चर्चासत्रे, लहान मुलांसाठी संस्कारवर्ग राबवणे.
  9. आयुर्वेदिक औषधांचा प्रसार करणे. स्वस्त जेनेरिक औषधांचा प्रसार करणे व त्याची विक्री करणे.
  10. नैसर्गिक साधन संपती वाढविणेसाठी पर्यावरण पूरक उपक्रम राबवणे. यासाठी वृक्षारोपण, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन, परसबाग व्यवस्थापन, स्वच्छता आदी साठी विशेष उपक्रम राबवणे.
  11. निराधार जेष्ठ नागरिक, अनाथ मुले, यांच्या संगोपनासाठी वृद्धाश्रम, अनाथाश्रम यांची स्थापना करणे.