आर्थिक, उत्पादन सहाय्य आणि ज्ञानवर्धनाद्वारे जीवनाचे सशक्तीकरण!
वेगाने बदलणाऱ्या आजच्या आधुनिक युगात महिला सबलीकरण वा महिला सशक्तीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. महिला सबलीकरण म्हणजे ती स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते आणि कोणाच्याही सहाय्याशिवाय जीवन जगू शकते. महिला सबलीकरण ही काळाची गरज आहे. परिस्थितीनुसार सर्व क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. महिला विकासाचा तसेच महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, वैचारिक, कौटुंबिक, व्यावसायिक अशा विविध घटकांचा विचार केला जात आहे. महिलाच्या आर्थिक विकासासाठी विविध सामाजिक संस्था कार्य करत असून त्याव्दारे शेती व शेती पूरक व्यवसायाला चालना दिली जात आहे. वेध फेडरेशनच्या माध्यमातून महिला आर्थिक , सामाजिक, वैचारिक सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने काम करीत आहे. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना उद्योजकतेची जोड देणे महत्वाचे आहे. महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधील उद्योजकाला बळकटी देण्याचे महत्वाचे काम वेध करत आहे. वेध फेडरेशनच्या माध्यामतून महिला सक्षमीकरण , आरोग्य सुविधा, स्त्री-पुरुष समानता, व्यावसायिक प्रशिक्षण, शासकीय योजनाची माहितीचा प्रसार करणे, ग्रामीण भागामध्ये व्यवसाय उभारणी करणेसाठी सहकार्य व रोजगार निर्मिती करणे, महिला बचतगट निर्मिती करणे अशा विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे.
बचत गट नोंदणी
व्यवसाय सहाय्य
कर्ज व बैंकिंग सुविधा
मार्केटिंग सहाय्य
Hospital Partners
Medical Partners
Lab Parters
आमचे उपक्रम
स्त्री – पुरुष समानता
महिलांना ग्रामीण भागामध्ये दुय्यम स्थान देण्यात आले आहे. समाजामध्ये पुरुषाला जे स्थान आहे त्याच प्रमाणे स्त्रीला सन्मान मिळायला हवा, महिलांच्या कौशल्याचा विकास होऊन सक्षम समाजाची निर्मिती व्हावी यासाठी संस्था कार्य करीत आहे.
शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण
शिक्षण हे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी सर्वात शक्तिशाली साधनापैकी एक आहे, कारण ते त्यांना ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास प्राप्त करण्यास मदत करू शकते. जे त्यांना त्यांचे जीवन आणि त्यांच्या कुटुंबांचे आणि समुदायांचे जीवन सुधारण्यास मदत करू शकते .
पर्यावरण संवर्धन
आजच्या आधुनिक युगामध्ये पर्यावरणाचे मोठ्या प्राणात नुकसान होत आहे. विकासाच्यानावाखाली विविध प्रकारच्या झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. नैसर्गिक उर्जा स्त्रोत निर्माण करणे (सौर उर्जा, पवन उर्जा, बायोगॅस इ.) आदी काम करण्याची गरज आहे ती या संस्थेच्या मध्यामातून करत आहे.
आर्थिक सक्षमीकरण
समाजामध्ये वाढलेली बेरोजगारी आर्थिक विषमता निर्माण करत आहे. त्यामुळे समाजामध्ये दुफळी निर्माण होत आहे. हि विषमता दूर करण्यासाठी सक्षम पर्याय उपलब्ध करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी महिला बचतगटांची निर्मिती करून त्यांचे संघटन करणे.
शेती संवर्धन
वाढत्या लोकसंख्येमुळे शेती उत्पन्नाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शेतीत कमी कालावधी मध्ये जास्त पिके घेता यावी, यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे शेतीचा पोत खराब होत आहे. परिणामी त्याचा परिणाम मानवाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
आरोग्य सुविधा
“आरोग्यम धनसंपदा” या उत्कीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. सामाजीतील प्रत्येक घटकासाठी नेत्र तपासणी शिबीर, महिलांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून त्या माध्यमातून उपचार संदर्भात मार्गदर्शन करणे, आरोग्य चर्चासत्रे आयोजित करणे.
राष्ट्र संवर्धन
समाजामध्ये बंधुभाव निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा प्रयत्न करणे. बलशाली व समृध्द भारत देश निर्माण करण्यासाठी सहकार्य करणे. समृध्द भारतासाठी निरोगी, सक्षम व बलवान संस्कारक्षम पिढी निर्माण करणे. राष्ट्राची मानवी शक्ती वृद्धींगत करून जीवनमान उंचाण्यासाठी प्रयत्न करणे.
उद्योजकता विकास कार्यक्रम
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शेती हा प्रमुख व्यवसाय असून त्याच्यावर कुटुंब चालवणे शक्य नाही. यासाठी ग्रामीण भागामध्ये लघु , कुटीर व अन्न प्रक्रिया उद्योग उभारून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे.
वेधच का ?
वेध मध्ये सदस्यता घेउन आपण अनेक फायदे घेऊ शकता. त्यामध्ये व्यवसाय उभारणी, त्याचे मार्केटिंग त्याविषयी निगडित बँकिंग सुविधा इत्यादि सुविधा वेध द्वारे दिल्या जातात.

फ़ास्ट व सोपी बँकिंग

कमी गुंतवणूक असलेले व्यवसाय

विश्वसनीय व अद्ययावत








